साहित्य:- २ वाट्या तांदूळ, १/२ वाटी मुगाची डाळ, १/४ वाटी चण्याची डाळ, दीड वाटी गूळ, १ नारळ, थोडे मीठ, वेलदोडा पूड, थोडे तूप.
कृती:- मुगाची डाळ थोडी भाजून घ्यावी. चणाडाळ तांबूस रंगावर भाजून घ्यावी. नंतर तांदूळ व दोन्ही डाळी पुरेसे पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात. शिजल्यावर घोटून घ्याव्यात. किंचित मीठ घालून खोबरे खवून वाटून त्यात मिसळावे व गूळ घालून सर्व मिश्रण पुन्हा शिजवावे. (आवडीप्रमाणे गूळ कमी – जास्त घालावा.) वेलची पूड घालावी. शिजवताना थोडे तूप घालावे. पातळसर मऊ भाताप्रमाणे शिजवावे. गरमागरम वाढावे. (आवडल्यास थोडे दूध घालून पातळ करावे.)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply