गोडाची कमळफुले

साहित्य:- १ वाटी मैदा, २ चमचे तूप, चिमूटभर सोडा, ५-६ चमचे साखर, कमळफुलाचा साचा (हा साचा बाजारात मिळतो.) तळण्यासाठी तेल.
कृती:- मैदा, गरम तूप, चिमूटभर सोडा व साखर एकत्र करावी. कणभर मीठ घालावे. नंतर त्यात पुरेसे पाणी घालून पीठ पातळसर भिजवावे. खोलगट कढईत भरपूर तेल गरम करावे. साचा गरम तेलात बुडवून ठेवावा. तेल चांगले तापले, की कमळफुलाचा साचा तयार केलेल्या पिठात अर्धा बुडेल इतकाच बुडवावा व काढून लगेच तेलात धरावा. किंचित तळून झाले की दांडा हलवावा म्हणजे फूल साच्यातून सुटून येईल. फूल चांगले तळून बाहेर काढावे. साचा सतत गरम तेलातच ठेवावा. ही कमळफुले खाण्यास कुरकुरीत, दिसावयास आकर्षक व सुंदर असतात. मैद्यात साखर न घालता कमळफुले बनवून साखरेच्या दोन तारी पाकात बुडवूनही केली जातात. कमळफुले जसजशी तळून होतील तसतशी जिलबीप्रमाणे पाकात सोडावी व काढून घ्यावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*