अक्रोड

अक्रोड एक उत्तम दर्जाचे फूड आहे. यामधील एएलए ( अल्फा-लिनोलेनिक अॅसिड) अत्यंत उपयुक्त तत्त्व आहे. शाकाहारी लोकांसाठी हे नैसर्गिक वरदान आहे. हे विविध प्रकारे आहारात वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ सलाडसोबत, पास्ता, आयस्क्रीम व ब्राउनीसोबत याचा उपयोग सहजपणे केला जाऊ शकतो.

आरोग्याच्या दृष्टीने हे उपयुक्त मानले जाते. अक्रोडमध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते.

आक्रोडमध्ये असलेले अँटीऑक्सीडंट्स हृदय निरोगी आणि कार्यरत ठेवण्यास मदत करतात. मूड ठीक करणे आणि चांगली झोप येण्यासाठी मदतीचा ठरतो. – आक्रोडमध्ये असलेला हा फॅट नैराश्य कमी करण्यासाठी फायद्याचा ठरतो. – अटेंशन, डेफिसिटी, हायपरअँक्टिव्हिटी सारखे आजार कमी होतात. आक्रोडमध्ये असणारे मोनो आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील इन्सुलिन संवेदनेसाठी चांगले असतात.आक्रोडमध्ये असणारे रासायनिक गुणधर्म रक्तप्रवाह उत्तम होण्यास मदत करतात. यामुळे त्वचा तजेलदार होते.

दररोज तीन ते चार आक्रोड खाल्ल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर होते.आक्रोडमध्ये असणारे विविध घटक आणि त्याचे तेल तणावाशी लढण्यात सहायक ठरतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

About संजीव वेलणकर 605 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*