कवी, गीतकार, गझलकार

भगवान रघुनाथ कुलकर्णी

कथाकार, कादंबरीकार व कवी “बी. रघुनाथ” म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी ७ कादंबर्‍या ६० कथा आणि १५० च्या आसपास कविता लिहिल्या होत्या. अवघ्या ४० व्या वर्षी ७ सप्टेंबर १९५३ रोजी त्यांचे निधन झाले.   Bhagwan […]

गुरुनाथ नारायण धुरी

“ग्लोरिया”, “समुद्रकविता”, “लालकोवळा काळोख” हे त्यांचे कवितासंग्रह, तर “आदिकाळोख” हा ललितगद्य लेखांचा संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची कविता गूढ, चिंतनात्मक व जीवनाच्या सखोल जाणिवेची असल्याचा समीक्षकांचा अभिप्राय आहे. […]

वासुदेवशास्त्री खरे

“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या. […]

वासुदेव वामन पाटणकर

“आजवर बेधुंदतेने मांड जैसा गायिला, त्याच त्या तल्लीनतेने जोगियाही गायिला” अशा शब्दांत त्यांनी आसक्ती आणि वैराग्य हे दोन्ही गुण शायरीत कसे असतात, याचे वर्णन केले आहे. पाटणकरांच्या आधीही शायरीचे तंत्र मराठीत वापरले गेले होते, पण “शायराना जिंदादिली” पाटणकरांनीच मराठीत आणली. […]

सदानंद शांताराम रेगे

कवी, कथाकार व अनुवादक सदानंद शांताराम रेगे यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी झाला. आधुनिक मराठी कविता समृद्ध करणार्‍या सदानंद रेग्यांनी आजच्या जगाशी सार्वकालिक “मी” चा विसंवाद आणि कालातीत मानवी विकार-वासना यांच्यावर बोट ठेवले. “अक्षरवेल”, […]

वासुदेव गोविंद मायदेव

वासुदेव गोविंद मायदेव यांनी अभिनयाला वाव देणारी “शिशुगीते” हा प्रकार मराठीत रुळवला. जुन्या अंकलिप्यांतील अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत. […]

योगिनी जोगळेकर

आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच योगिनी जोगळेकर यांनी “पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. […]

हणमंत नरहर जोशी

“दत्त दिगंबर दैवत माझे”, “देव माझा विठूसावळा” या गीतांचे कवी हणमंत नरहर जोशी म्हणजेच “कवी सुधांशु” यांचे निधन. आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. […]

दत्तप्रसन्न नारायण कारखानीस

‘कुणा आवडतो मोर पिसार्‍याचा’ या कवितेचे कवी दत्तप्रसन्न नारायण कारखानीस यांचा जन्म १७ ऑगस्ट १९०८ साली झाला. त्यांच्या कवितांचे ‘क्षितिजावर’ व ‘काव्यविलास’ असे दोन संग्रह निघाले. त्यांच्या अनेक कविता मराठी क्रमिक पुस्तकांमध्ये समाविष्ट झाल्या.   […]

1 2 3 4 5 10