कवी, गीतकार, गझलकार

अनंत पाटील

आजमितीला त्यांची एकूण ३२ ‘अनंताची अभंग भजने’, ‘अनंताची अभंग गीते’ व ‘कोळीगीते व नृत्यगीते’ या शीर्षकाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. टी सिरिज, एच.एम.व्ही, कृणाल यांसारख्या प्रख्यात ध्वनीकंपन्यांची रेकॅार्ड कॅसेटस् यांचा आकडा सहज सांगता येण्यासारखा नाही. […]

कवी यशवंत

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत. १९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कवी यशवंत हे अध्यक्ष होते. […]

बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित

‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. […]

सूर्यकांत रामचंद्र खांडेकर

सूर्यकांत रामचंद्र खांडेकर हे कवी होते. `त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केलेले  गीत त्यांच्याच लेखणीतून आले. […]

अनंत आत्माराम काणेकर

मराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत आपलं लेखन पोहोचवलं. “चित्रा” या साप्ताहिकाचे संपादक म्हणून ही अनंत काणेकरांनी काम पाहिलं.
[…]

यशवंत देव

भावगीताच्या विश्वातील तळपता तारा म्हणून ज्या मोजक्या संगीतकारांची नावे घ्यावी लागतील, त्यामध्ये यशवंत देव यांचे नाव फार वरचे आहे. त्यांची कितीतरी गाणी आजही ऐकताना मन आनंदाने भरून जाते. स्वत: उत्तम कवी असल्याने त्यांनी संगीतकार म्हणून केलेली कामगिरी अधिक उठावदार आहे. […]

दिलीप पुरुषोत्तम चित्रे

संत तुकारामांना इंग्रजीत नेणारे ज्येष्ठ साहित्यिक, प्रयोगशील कवी, वारकरी परंपरेचे अभ्यासक, चित्रपटकार व चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. […]

शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)

बाल-गीत, कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे काव्यसंग्रह, चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’ हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी हे माधव जूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले. […]

महादेव मोरेश्वर कुंटे

मराठीखेरीज संस्कृत व इंग्रजी भाषांत ग्रंथरचना, काव्यरचना करणारे आणि गुजराती, सिंधी, लॅटिन, फारसी व संस्कृत या भाषांचे जाणकार महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म १ ऑगस्ट १८३५  रोजी झाला. सोप्या मराठीत “राजा शिवाजी” हे वीररसप्रधान महाकाव्य त्यांनी लिहिले. […]

1 2 3 4 10