शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)

रविकिरणमंडळातील एक प्रमुख कवी

कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. रविकिरणमंडळातील ते एक प्रमुख कवि होते. बालगीत हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह, तर कांचनगंगा, फलभार,चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे नंतर प्रकाशित झालेले संग्रह.

त्यांच्या आणि कवी यशवंतांच्या कवितांचे एकत्रित वीणाझंकार व यशोगौरी हे संग्रह आहेत. पोर खाटेवर मृत्युच्याच दारा ही गाजलेली कविता गिरीश यांचीच. मराठी नाट्यछटा माधव ज्यूलिअन यांचा स्वप्नलहरी तसेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांचे ख्रिस्ताय या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले होते.

चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’ हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी हे माधव जूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर मराठी नाट्यछटा तसेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली.

कवी यशवंत यांच्यासह त्यांचे यशो-गिरी व वीणाझंकार हे संग्रह प्रकाशित झाले होते. कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन ४ डिसेंबर १९७३ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (13-Dec-2016)

कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (4-Dec-2017)

कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (6-Nov-2019)

Shankar Keshav Kanetkar Alias Kavi Girish

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*