रोहिणी भाटे

रोहिणी भाटे यांचा शिष्यपरिवार जगभर विखुरला आहे. १९४७ मध्ये त्यांनी नृत्यभारती कथक नृत्य अकादमी स्थान केली. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांच्या अनेक शिष्यांना गुरु रोहिणीताईंच्या अखंड मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. […]

रितेश देशमुख

रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या आणि चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या ‘यलो’ चित्रपटला यंदाच्या ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष परिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी गाडगीळ या विशेष मुलीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘यलो’ चित्रपटाने सर्वांचे लक्षवेधून घेण्यास भाग पाडले. […]

राहुल सोलापूरकर

महाविद्यालयीन काळात सलग पाच वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग आणि अनेक बक्षिसे पटकाविली आहेत. त्याच काळात महाराष्ट्र आणि बाहेरील मिळून एकूण ६५ वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत ८ वर्ष सहभाग आणि अनेक बक्षिसे मिळवत २२ हौशी नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. […]

राहुल रानडे

काकस्पर्श, वास्तव,अस्तित्व, कोकणस्थ, सुंबरन,साने गुरुजी,डॉ.प्रकाश आमटे अशा मराठी, हिंदी चित्रपटाना त्यांनी संगीत दिले आहे. राहुल रानडे यांनी भास्कर चंदावरकर, आनंद मोडक, अशोक पत्की यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारां बरोबर काम केले आहे. […]

रामनाथ पारकर

भारतातर्फे दोन कसोटी सामने खेळलेले त्यांचे दोन्ही सामने इंग्लंडविरुद्धच होते. गुणवत्ता असूनही पारकर यांच्या वाटयाला केवळ दोनच कसोटी सामने आले. ७०च्या दशकात सुनील गावस्कर यांचे सलामीचे साथीदार म्हणून पारकर यांना पुरेशी संधी मिळाली नाही. […]

रामनाथ थरवळ

त्यांच्या कार्यशाळेतून शिकून गेलेल्या कलाकारांची यादी तशी मोठी आहे. विद्या बालन, निशिगंधा वाड, किशोरी शहाणे, सुमित राघवन, पंकज विष्णू, रसिक ओक जोशी, विशाखा सुभेदार, अतुल काळे, तारका पेडणेकर, दिपक वीज, बॉबी वीज ही त्यातली काही नावे. […]

रामदास फुटाणे

सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार मिळाले. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याची निवड झाली. सर्वसाक्षी चित्रपटाची बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या पाचक्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सकासाठी निवड झाली होती. […]

रामदास कामत

‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत. तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे. […]

रामचंद्र शंकर वाळिंबे

डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. […]

रामचंद्र ठाकुर

रामचंद्र हे ठाकूर हिंदी आणि गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक होते. रामचंद्र ठाकूर यांची खासियत ही होती की ते अकरा भाषा बोलणारे बहुभाषी होते. ते पाली भाषेचे अभ्यासक होते. […]

1 2 3 80