राजा मयेकर

राजा मयेकर यांनी काम केलेले ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’,‘असूनी खास घरचा मालक’, ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’, ‘श्यामची आई’, ‘धांदलीत धांदल’, ‘भावबंध’, ‘बंबदशाही’, ‘झुंझारराव’ ही त्यांची गाजलेली नाटके. […]

राजा बारगीर

कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. […]

राजा बढे

राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे. […]

राजमाता विजयाराजे शिंदे

विजयाराजे शिंदे आधी कॉंग्रेसमध्ये होत्या, पण इंदिरा गांधी यांनी राजघराणे नष्ट करण्यासाठी पाऊले उचलल्याने त्या नाराज झाल्या. १९६७ मध्ये कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी त्या वेळच्या जनसंघात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. मध्य प्रदेशच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. […]

राजन भिसे

दिग्दर्शक मंगेश कदम यांचे नाटक ‘अधांतर’. जयंत पवार यांचे ‘माझं घर’, प्रशांत दळवी यांचं ‘सेलिब्रेशन’ हे नाटक ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘ढोलताशे’ अशी अनेक नाटके त्यांनी केली आहेत. अभिनय व नेपथ्य या बरोबरच सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काम राजन भिसे बघत आहेत. […]

राजदत्त

१९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो. […]

रसिका जोशी

रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या. […]

रवींद्र साठे

सामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.”पिक करपल” हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत. […]

रवींद्र सदाशिव भट

नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत. […]

रवींद्र म्हात्रे

ब्रिटनमध्ये कार्यरत जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या सहयोगी जम्मू-काश्मीर लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी बर्मिंगहम मध्ये त्यांचे अपहरण केले तेव्हा भारतीय राजदूत रवींद्र म्हात्रे पहिल्यांदा ३ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रसिद्धीस आले. […]

1 2 3 4 5 80