दादा धर्माधिकारी

सर्वोदयदर्शन, गांधीजी: एक दर्शन, क्रांतिनिष्ठा, आपल्या गणराज्याची घडण, पाकिस्थानी वृत्तीचा प्रतिकार अशी प्रेरक पुस्तके त्यांनी लिहिली होती. […]

महादेव मोरेश्वर कुंटे

मराठीखेरीज संस्कृत व इंग्रजी भाषांत ग्रंथरचना, काव्यरचना करणारे आणि गुजराती, सिंधी, लॅटिन, फारसी व संस्कृत या भाषांचे जाणकार महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म १ ऑगस्ट १८३५  रोजी झाला. सोप्या मराठीत “राजा शिवाजी” हे वीररसप्रधान महाकाव्य त्यांनी लिहिले. […]

पांडुरंग नारायण कुलकर्णी

प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक पांडुरंग नारायण कुलकर्णी यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९२२  रोजी झाला. “संशोधन धारा” या ग्रंथातून त्यांनी प्राचीन कवींच्या कवितांवर तोपर्यंत झालेल्या संशोधनातील चुका दाखवून निर्णायक मत व्यक्त केले. याशिवाय “नागेशमाहात्म्य” चे संपादन त्यांनी केले. […]

माधव कृष्ण पारधी

“मुसलमानी आमदानीत भारतीय संगीत” हे त्यांनी अभ्यासान्ती लिहिलेले पुस्तक, तर “भारतीय सैन्याची परंपरा” (मूळ लेखक धर्मपाल), “स्वातंत्र्याचा लढा” (बिपिनचंद्र त्रिपाठी), “भारतीय वाद्ये” (चैतन्यदेव) आदी पुस्तके त्यांनी अनुवादित केली. […]

डॉ. भगवान गणेश कुंटे

ऐतिहासिक ग्रंथांचे अनुवादक आणि महाराष्ट्र सरकारच्या “स्वातंत्रसैनिक चरित्रकोशा” च्या दुसर्‍या खंडाचे संपादक डॉ. भगवान गणेश कुंटे यांचा जन्म ४ जून १९२० रोजी झाला. “औरंगजेबाच्या कुळकथा” व “औरंगजेबाचा इतिहास” (दोन्ही यदुनाथ सरकारांच्या पुस्तकांवरुन), “पानिपताची मोहिम अथवा काशिराजाचा वृतान्त” (काशिराज पंडिताच्या मूळ […]

नारायण बापूजी कानिटकर

नारायण बापूजी कानिटकर हे लेखक, नाटककार आणि अनुवादक होते. “तरुणी शिक्षण नाटिका” आणि “संतती कायद्याचे नाटक” लिहून सद्य सामाजिक विषयांवरील मराठी नाटकांचा पाया त्यांनी रचला. ४५ वर्षाच्या आयुष्यात, वकिली शिक्षणानंतर त्यांनी १० नाटके लिहिली होती. त्यांत बडोदे संस्थानातील विषप्रयोग (मल्हारराव महाराज), […]

डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे

निष्णात डॉक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते. “वाग्भट” या त्यांच्या ग्रंथावरून त्यांच्या आयुर्वेदावरील दांडग्या अभ्यासाची कल्पना येते. “स्त्रीरोगविज्ञान” या ग्रंथासह “ज्ञानेश्वरी” व “अमृतानुभव” या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. १५ जुलै १८९६ रोजी त्यांचे निधन झाले.   Dr Anna Moreshwar Kunte

माधव राजाराम कानिटकर

“प्रपंच”, “मानिनी” व “रुपा” या मासिकांचे संस्थापक-संपादक माधव राजाराम कानिटकर हे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. त्यांनी १५ वर्षांत ५० कादंबर्‍या आणि शंभरावर कथा लिहिल्या. चंदनाची वीणा, आषाढमेघ, कथामाधव ही त्यांच्या कथासंग्रहांची तर ग्रीष्माची […]

अंबादास शंकर अग्निहोत्री

कथाकार व आकाशवाणीचे श्रुतिकाकार अंबादास शंकर अग्निहोत्री यांनी “माणूस” या टोपण नावाने वृत्तपत्रीय लेखन केले. मुक्ता आणि इतर कथा, घुंगरू हे त्यांचे कथासंग्रह. १६ नोव्हेंबर १९७६ रोजी त्यांचे निधन झाले.     Ambadas Shankar Agnihotri

1 2 3 4 5 43