रसिका जोशी

मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री रसिका जोशी यांचा जन्म १२ सप्टेंबर १९७२ रोजी झाला.

त्यांनी मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला.

महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळीतून या अभिनेत्रीचा उदय झाला. रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली.

गायब, वास्तुशास्त्र, भूत अंकल, भुलभुलय्या, मालामाल वीकली, जॉनी गद्दार, बिल्लू बार्बर, खलबली या हिंदी भाषेतील चित्रपटातूनही त्यांनी अभिनय केला.

रसिका जोशी यांचे ७ जुलै २०११ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*