रवींद्र साठे

स्पष्ट शब्दोच्चार,खर्जातील घनगंभीर स्वर,आणि भावपूर्ण गायन ही रवींद्र साठे यांची खासीयत. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.

रविंन्द्र साठे यांचे श्री. मुकुंदराव गोखले यांच्याकडे रीतसर शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले.बालकलाकार म्हणून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले.पण महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या या शिक्षणात खंड पडला.त्याच वेळी सुगम संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले.आणि ते पुन्हा गाण्याकडे वळले.पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांची गानसाधना सुरु झाली.

रवींद्र साठे हे नाव सुपरिचित झाले ते ”घाशीराम कोतवाल”या नाटकातील त्यांच्या गायक नटाच्या भूमिकेमुळे .त्यांच्या या भूमिकेबद्दल सी.रामचंद्र,कुमार गंधर्व,वसंतराव देशपांडे अश्या मान्यवरांकडून त्यांना दाद मिळाली. मधुकर गोळवलकर,सी.रामचंद्र,राम कदम,आनंद मोडक,हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके अशा नामवंत संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे.”ओंजळीत स्वर तुझेच”हा त्याचा आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेला अल्बम रसिकांनी खूप नावाजला आहे.

सामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.”पिक करपल” हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*