रवींद्र सदाशिव भट

ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र सदाशिव भट यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३९ रोजी झाला.

साहित्याइतकीच अध्यात्माचीही ओढ असणाऱ्या रवींद्र सदाशिव भट यांनी एकूण १४ कादंबऱ्या, पाच नाटके, सहा काव्यसंग्रह व चित्रपट, अनुबोधपट, बालवाङमय असे विपुल लेखन केले. इंदायणी काठी, सागरा प्राण तळमळला, भगीरथ, आभाळाचे गाणे, देवाची पाऊले, भेदिले सूर्यमंडळा या त्यांच्या कादंबऱ्यांना वाचकांची विशेष पावती मिळाली होती.

नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत.

त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, मसाप पुरस्कार, चेतना ट्रस्टचा पुरस्कार, दर्पण, पुणे विद्यापीठाचा आणि ना. ह. आपटे स्मृती पुरस्कार मिळाले होते.

रवींद्र सदाशिव भट यांचे २२ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*