राजीव तांबे

राजीव तांबे गेली अनेक वर्षे मुलांसाठी काम करत आहेत. मराठीतले लोकप्रिय बालकथाकार राजीव तांबे यांचा जन्म ४ ऑगस्ट रोजी झाला. त्यांच्यासाठी विविध पुस्तके, हसत-खेळत शिक्षणाच्या पद्धतींचा विकास केला आहे.

युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे. त्या माध्यमातून विविध स्तरातील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेत त्यांनी शिकवण्याची पद्धत विकसित केली आहे. यामध्ये कविता, कथा, एकपात्री प्रयोग, नाटक, विज्ञानकथा अशा विविध वाङ्मय प्रकारांची निर्मिती केली आहे.

अक्कम बक्कम, छत्रीची जादू आणि इतर कथा, दांडोबा राक्षस आणि गुळगुळीत मावशी, अजब कथा, अशोक आणि अमीन, आई आणि बाळ, आमची शाळा, मगरू आणि इतर कथा, गंमत गँग, गंमत जंमत, गंमतशाळा भाग १, २, गुळाची ढेप आणि सरबत, चटकन पटकन वाचन लेखन, झॅकपॅक शोध आणि इतर कथा, बंटू बसला ढगात आणि इतर कथा, ससुल्या आणि इतर कथा, विज्ञान गमती-सहज सोपे प्रयोग, माझे मराठी निबंध, भाग १,२, सु सुटका आणि रंगीत डोंगर, प्रेमळ भूत संच अशी त्यांची ५० हून जास्त पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*