योगिनी जोगळेकर

नाटककार, गायिका, कवयित्री

गायिका, कवयित्री, नाटककार व सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला.

योगिनी जोगळेकर यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच ‘राष्ट्रसेविका समिती’च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व नाटकेही प्रसिद्ध झाली.

पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर “” या सम हा “” आणि राम मराठे यांच्या जीवनावर राम प्रहर”” या चरित्रांचे त्यांचे लेखन वेगळे ठरले.

वयाच्या आठव्या वर्षापासून योगिनीबाई शंकरबुवा अष्टेकर यांचेकडे संगीत शिकत होत्या. त्यानंतर योगिनी जोगळेकर यांनी राम मराठे यांचे शिष्यत्व पत्करले. आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच योगिनी जोगळेकर यांनी “पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले.

आकाशवाणीवरील गीतरामायणाच्या प्रथम प्रसारणात विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति सूड घे त्याचा लंकापति हे गाणे योगिनी जोगळेकर यांनी गायले होते.

योगिनी जोगळेकर यांनी “राम प्रहर ” हे राम मराठे यांच्या जीवनावर चरित्र लेखन केले होते.

योगिनी जोगळेकर यांचे निधन १ नोव्हेंबर २००५ रोजी झाले.

त्यांची गीतसंपदा

मधुर स्वरलहरी या

सखे बाई सांगते मी

हरीची ऐकताच मुरली

हे सागरा नीलांबरा


सखे बाई सांगते मी नवनवल गे
गमते मना मृदु भावना
हृदयींची शतजन्मींची गे
स्वप्नाीत तयाशी प्रहर प्रहर बोलते
या मनोरथातुनी योजनभर विहरते
गमते मना सुख साधना
हृदयींची शतजन्मींची गे
नित प्रीत उमलतसे
माला मी गुंफितसे
भक्ति ज्योति तेवतसे
मन हसे, तन हसे, मधुरसे”

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*