कवी, गीतकार, गझलकार

माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)

“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते. […]

किशोर कदम उर्फ कवी सौमित्र

काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले […]

जिंगल्सचा राजा, संगीतकार अशोक पत्की

पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) […]

गीतकार भालचंद्र गजानन खांडेकर

लोकप्रिय गीतकार प्रा. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा जन्म २८ जून १९२२ रोजी झाला. “चंद्रप्रकाश”, “गंधसमीर” हे त्यांचे कवितासंग्रह. प्रेमातील विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण त्यांच्या कवितांतून दिसतेच, परंतु दांभिकता, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रवृत्तीही दिसते. “श्लोक केकावली”, […]

दत्तात्रेय अनंत आपटे

“अनंततनय” नावाने काव्यलेखन करणारे दत्तात्रेय अनंत आपटे. “श्री महाराष्ट्र शारदामंदिर” या कवींसाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते आधारस्तंभ होते. “हृदयतरंग (भाग १ ते ३), पद्यदल आणि “श्रीमत तिलक-विजय” हे लो. टिळकांचे ओवीबद्ध चरित्र आदी काव्यपुस्तके त्यांच्या नावावर […]

वामन रामराव कांत ( कविवर्य वा. रा. कांत )

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात,  त्या तरुतळी विसरले गीत,  सखी शेजारिणी.. अशी एकाहून एक सर्वांच्या ओठी असलेली गाणी लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत. वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर […]

प्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे

राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्‍यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते […]

मंगेश पाडगावकर

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली. […]

रमेश तेंडुलकर

कवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला. एम. ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे सी. आय. डी. विभागात काम केले. परंतु मुळात समीक्षकाची वृत्ती असल्यामुळे ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात रजू झाले. […]

1 3 4 5 6 7 10