उपेन्द्र भट

पं.उपेंद्र भट यांनी संगीत विषयात एम.ए. केले असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) तर्फे त्यांना `संगीत विशारद’ आणि `संगीत अलंकार’ पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, चित्रपट संगीत, भावगीत, राग निर्मिती, संतवाणी, हिंदी द्वंद्वंगीते असे अनेकविध पैलू त्यांच्या गाण्यात आहे. […]

उत्तरा केळकर

मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचे शास्त्रीय संगीताचे गुरू पं. फिरोज दस्तूर. व गाण्याचे गुरू श्रीकांतजी ठाकरे. उत्तरा केळकर यांचे ‘बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला’ हे गाणेही लोकप्रिय आहे. […]

अमोल बावडेकर

अमोल बावडेकर हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत एक नावाजलेलं नाव आहे. अमोल बावडेकर हे अभिनेता आणि गायक म्हणून ह्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहेत. […]

प्रसाद सावकार

‘पंडितराज जगन्नाथ’मध्ये त्यांना सुरुवातीला एकच गाणे होते. पण त्यांच्या गाण्यावर फिदा झालेल्या रसिकांनी त्यांच्यासाठी आणखी एखादे गाणे नाटकात घालण्याची मागणी केल्यानंतर ‘जय गंगे भागीरथी’ हे गाणे त्यात घालण्यात आले आणि ते चांगलेच गाजले. […]

सुलोचना चव्हाण

सुलोचना चव्हाण यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात लावणीचा जागर सतत होत राहिला. ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘देव माझा मल्हारी’ अशा कितीतरी लावण्या रसिकांच्या ओठांवर सतत तरळत होत्या. […]

योगिनी जोगळेकर

आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच योगिनी जोगळेकर यांनी “पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. […]

शांता आपटे

नाटक आणि शुटिंग्समधून वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियासोबत व्यतीत करण्याचा प्रयत्न करत; इंग्रजी भाषेचं वाढतं महत्व ओळखून शांता आपटेंनी आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले, पण घरात असताना अगदी सक्तीने मराठीतच बोलायचे यावर त्या ठाम असायच्या. […]

पार्श्वगायिका आशा भोसले

आपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांचा लौकिक आहे. प्रदीर्घ काळ अनेकविध प्रकारची गीतं आपल्या सहज शैलीत गाऊन चिरतरुण, चतुरस्त्र गायिका म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. […]

गा‌यिका आशा खाडिलकर

ज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. […]

1 4 5 6 7