शांता आपटे

”भारतीय सिनेमांमध्ये सामाजिक, स्त्रीप्रधान असे चित्रपट जेव्हा बनू लागले त्यावेळी अनेक गुणी कलाकार या इंडस्ट्रीला लाभले. त्या काळच्या कलाकारांमध्ये असलेल्या असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करता आलं आणि त्यांचं नाव चित्रपटाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले; त्यापैकीच एक नाव होते शांता आपटे. त्यांचा जन्म १९ मार्च १९२३ रोजी झाला.

कला तसंच अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवायची असेल तर सर्वच गोष्टी अवगत असणं गरजेच्या आहेत; हे माहित असल्यामुळे शांता आपटेंनी ड्रायव्हींग, स्वीमिंग यासारखे प्रकार शिकून घेतले. नृत्यात तर त्या निपुणच होत्या! भालजी पेंढारकरांच्या ‘श्यामसुंदर’ या चित्रपटातून या सिनेमात शांता आपटेंनी ‘राधा’ ची भूमिका साकारली; त्यानंतरच्या २-३ वर्षात शांताजींनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं व कालांतराने ‘प्रभात’च्या ‘अमृत-मंथन’ , ‘वहॉं’ , ‘राजपुतरमणी’ सारख्या हिंदी चित्रपटातून भूमिका करुन आपल्यातील वैविध्यपूर्ण कलेची चुणूक दाखवून दिली; तसंच ”गोपालाकृष्ण” , ”अमरज्योती” या चित्रपटातील भूमिका सुध्दा प्रचंड गाजल्या; ”कुंकू” चित्रपटानी त्यांच्या अभिनयावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटवली. कारण त्याकाळात बर्लिन फेस्टीव्हल मध्ये शांता आपटेंच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं, आणि कुंकू त्यांच्या कारकीर्दीचा ”माइलस्टोन” ठरला.

नाटक आणि शुटिंग्समधून वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियासोबत व्यतीत करण्याचा प्रयत्न करत; इंग्रजी भाषेचं वाढतं महत्व ओळखून शांता आपटेंनी आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले, पण घरात असताना अगदी सक्तीने मराठीतच बोलायचे यावर त्या ठाम असायच्या.

अभिनेत्री शांता आपटेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यावेळी पंडित नेहरूंनी शांता आपटेंना वंदेमातरम गाण्याची विनंती केली. आणि त्यांच्या सुरमधूर स्वरांनी कार्यक्रमाला चार चांद लागले. मा.शांता आपटे यांचे २४ फेब्रुवारी १९६४ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*