शांता जोग

शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. शांता जोग यांचा जन्म २ मार्च १९२५ रोजी झाला. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ’महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो.

वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती.

शांता जोग यांचे १२ सप्टेंबर १९८० रोजी अपघाती निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*