उपेन्द्र भट

शास्त्रीय गायक

पं.उपेंद्र भट यांनी संगीत विषयात एम.ए. केले असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) तर्फे त्यांना `संगीत विशारद’ आणि `संगीत अलंकार’ पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचा जन्म २१ एप्रिल १९५० रोजी मंगळूर येथे झाला. उपेन्द्र भट यांनी मंगलोर च्या श्री नारायण पै यांच्याकडे संगीताची तालमीला सुरुवात केली. नंतर माधव गुढी व पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे शिक्षण घेतले. पं.उपेंद्र भट हे पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ पट्टशिष्य असून पंडितजींकडून त्यांना तालीम मिळाली असून, त्यांची कारकीर्द जवळून पाहाण्याची संधीही त्यांना मिळाली आहे.

शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, चित्रपट संगीत, भावगीत, राग निर्मिती, संतवाणी, हिंदी द्वंद्वंगीते असे अनेकविध पैलू त्यांच्या गाण्यात आहे. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, ग. दि. माडगुळकर लिखित `इंद्रायणी काठी लाभली समाधी’, श्रीनिकेतन, अबीर गुलाल, माझे माहेर पंढरी, कानोबा तुझी घोंगडी, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, अशा एकापेक्षा एक अभंग व भक्तीगीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध होतात.

अमेरिकेतील आंध्रप्रदेश रहिवासी संघटनेच्यावतीने त्यांना `म्युझियन ऑफ दि इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील ‘कंठ संगीत’ पुरस्कार पं. उपेंद्र भट यांना मिळाला आहे.

अधिक विस्तृत लेखासाठी:

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*