परभणी जिल्हा

परभणी परिसराशी अनेक पौराणिक संदर्भ जुळलेले आहेत. संत जनाबाईंच्या विठ्ठलभक्तीचा स्पर्श या जिल्ह्याला झालेला आहे. जिंतूरसारखे जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण या जिल्ह्यात आहे.शिवाय दक्षिण गंगेचा (गोदावरीचा) काठ लाभलेल्या या जिल्ह्यातून मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत आहे. या वैशिष्ट्यांमुळे परभणी जिल्हा मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील उल्लेखनीय जिल्हा बनला आहे.