नांदेड जिल्हा

नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते तर नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. ऐतिहासिक महत्व लाभलेला नांदेड जिल्हा श्री रेणुकामातेचे मंदिर व शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचे समाधिस्थान या तीर्थस्थळांमुळे धार्मिकदृष्ट्याही महत्वाचा आहे. येथील गोदावरी नदी. कापसाचे उत्पादन, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प, कंधारचा भुईकोट किल्ला आदी वैशिष्ट्येही उल्लेखनीय आहेत.