लातूर जिल्हा

Latur District

लातूर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा असून अलीकडच्या काळात लातूर एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र बनले आहे. ३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३.५६ वाजता झालेल्या ह्या भीषण भुकंपामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु पुढील काळात जिल्हा या धक्क्यातून सावरला आणि आता तो प्रगतीपथावर आहे.