काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.

१९६० सालापर्यंत डी.आर. काँगो ही बेल्जियम देशाची ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर १९७१ ते मे १९९७ दरम्यान हा देश झैरे ह्या नावाने ओळखला जात असे. १९९६ ते २००३ दरम्यान डी.आर. काँगो ह्या देशात २ युद्धे झाली. ह्या युद्धांमध्ये तब्बल ५४ लाख बळी गेले. ह्या युद्धांमुळे हा देश जवळजवळ पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.

डी.आर. काँगो हा जगातील सर्वांत मागासलेल्या व गरीब देशांपैकी एक आहे. आजही रोगराई, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे येथे दरमहा ४५,००० लोक मृत्यूमुखी पडतात.

राजधानी व सर्वात मोठे शहर : किन्शासा
अधिकृत भाषा : फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : ३० जून १९६०
राष्ट्रीय चलन : काँगो फ्रँक

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*