शेव बटाटा दही पुरी

साहित्य : पाणीपुरीच्या पुर्‍या एक पाकीट (सुमारे ५० पुर्‍या), ३ मोठे उकडलेले बटाटे, दीड वाटी बारीक शेव, दोन कप भरून गोड दही, लाल तिखट २ चहाचे चमचे, मीठ २ चहाचे चमचे, बारीक कापलेला कांदा १ वाटी, धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, अर्धी वाटी चिंच आणि गूळ यांची गोड चटणी.

कृती : उकडलेले बटाटे सोलून एका ताटात ठेवून बारीक कुस्करा. त्यात १ चमचा मीठ व १ चमचा जिरे पूड घालून ते छान कालवून घ्या. दही घुसमळून त्यात थोडे लाल तिखट व १/२ चमचा मीठ घाला. आता एक प्लेट घेऊन त्यात पाच-सात पुर्‍या ठेवा. पुर्‍या वरून हाताने फोडा, त्यात उकडलेल्या बटाटयाचे तुकडे भरा. त्यावर चमच्याने घुसळलेले दही घाला. त्यावर चिंचेची चटणी थोडी थोडी घाला. त्यावर बारीक शेव घाला, त्यावर थोडा कांदा घाला. हवे असल्यास लाल तिखट व किंचित मीठ टाका. सर्वात शेवटी त्यावर कोथिंबीर घाला.

टीप : सगळया प्लेट्स एकदम भरून ठेवू नयेत. पुर्‍या मऊ पडतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*