चिकन मलाई टिक्का

साहित्य : बोनलेस चिकन – १/२ किलो, दही – ३/४ कप, मिरपुड – १ चमचा, क्रीम – १ चमचा, कॉर्न फ्लोअर – ३ चमचे, गरम मसाला पावडर – १/२ चमचा, वेलची पावडर – १/४ चमचा, लसुण पेस्ट – १ चमचा, आल्याची पेस्ट – २ चमचे, […]

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १३ – येणारा आधुनिक काळ

आता यापुढचा जमाना तयार खाद्यपदार्थांचा आहे. एकविसावं शतक हे रिमिक्स आणि फ्युजनचं आहे. पण आपल्या संपूर्णपणे विज्ञानाधिष्टित अशा खाद्यसंस्कृतीचा वारसा सांगणारा आपला आहार हाच संतुलित आणि आरोग्याला योग्य असा आहार आहे आणि याचा सार्थ अभिमान आपण बाळगायला पाहिजे. […]

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १२ – स्वातंत्रोत्तर काळ

एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्या आधी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा पडल्याने रेशनिंगवर अन्नधान्य विकण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीयांना त्याचा होणारा फायदा लक्षात आल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही आजतागायत रेशनच्या दुकानात धान्य मिळत आले आहे. किंबहुना रेशनकार्ड हा महत्वाचा दस्तऐवज गणला जातो. […]

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ११ – पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिशांचा काळ

भारतीय खाद्यसंस्कृतीने अशा प्रकारची समृद्धी गाठलेली असतानाच भारताच्या किनार्‍यावर पोर्तुगीजांचं आगमन झालं. त्यांच्याबरोबर त्यांनी मिरची, बटाटा, टोमॅटो, मका, भोपळी मिरची, रताळी आणि काजू आणले. रिफाइण्ड साखर त्यांनी आणली. यीस्टचा वापर करून पाव बनविण्याचं तंत्र शिकवलं. यीस्ट घातलं की पीठ फुगून दुप्पट होतं म्हणून पावाला डबलरोटी म्हाणायची पद्धत पडली. […]

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १० – मोगल आक्रमणानंतरचे बदल

मोगल आक्रमणानंतर भारतीय खाद्यसंस्कृतीत आणखी बदल झाले. तांदूळ आणि मांसाचे तुकडे यांच्या मिश्रणातून बनणारे विविध पुलाव, कबाब, सामोसे, फळे वापरून केलेले गोड पदार्थ आणि फालुदा, सरबते या सारख्या पदार्थांनी अव्वल स्थान मिळवलं. […]

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ९ – परकीय आक्रमणांचा परिणाम

भारतावर अनेकांची आक्रमणे झाली. अनेक देशांबरोबर व्यापारही होता आणि त्याचा परिणाम इथल्या खाद्यसंस्कृतीवर कसा झाला ते पहाणंही मनोरंजक ठरेल तेव्हां त्याचा आढावा आता घेऊ. […]

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ८ – मानसोल्लास ग्रंथ

आतापर्यंत आपण भारतात निर्माण झालेल्या अन्नपदार्थांविषयीच्या ग्रंथ संपदेबद्दल माहिती घेतली. या ग्रंथ संपदेमधलं अमूल्य रत्न म्हणून राजा सोमेश्वराने लिहिलेल्या ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’ अर्थात् ‘मानसोल्लास’ या ग्रंथाचा उल्लेख करावाच लागेल. बाराव्या शतकात लिहिला गेलेला हा ग्रंथ जगातला पहिला ज्ञानकोश गणला जातो. […]

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ७ – मौल्यवान ग्रंथसंपदा

बुद्ध आणि जैन कालात कमी झालेलं मांसाहाराचं महत्व सुंग कालात पुन्हा वाढलं. सातवाहन आणि पल्लवांसारखे हिंदू राजे मांसभक्षण करीत होते. चरकसंहिता आणि सुश्रूतसंहिते सारखे ग्रंथ त्या काळात निर्माण झाले. […]

1 2 3 6