मटण मसाला

साहित्य: पाव किलो मटण, 1 मोठा कांदा उभा बारीक चिरलेला ,2 ते 3 चमचे स्पेशल आगरी कोळी मसाला,150 ग्राम दही , अर्धा चमचा हळद ,चवीनुसार मीठ ,2 छोटे चमचे आलं-लसूण-मिरची पेस्ट

अक्खा मसाला :
१ इलायची, 2 ते 3 लवंग , 1 चक्री फुल ,२ तमालपत्र ,४ ते ५ काळीमिरी (हे सर्व पदार्थ हलकेच ठेचून घ्या)

वाटण :अर्धी खोबऱ्याची भाजलेली वाटी ,२ ते ३ पाकळ्या लसूण ,1 ते 2 हिरव्या मिरच्या , कोथिंबीर , अर्धा चमचा जिरे , अर्धा तुकडा आलं मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या

कृती : मटण स्वच्छ धुवून त्यावर 2 ते 3 चमचे आगरी कोळी स्पेशल मसाला ,अर्धा चमचा हळद ,150 ग्राम दही ,2 चमचे आलं लसूण मिरची पेस्ट टाकून 3 ते 4 तास फ्रीज मध्ये ठेवून चांगलं मॅरीनेट करून घ्या.

३ ते ४ पळी तेल गरम करून घ्या , त्यामध्ये बारीक उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवा त्याच वेळी अक्खा मसाला सुद्धा परतवून घ्या .आता सर्व पदार्थ,वाटण आणि मटण एकत्र करून त्यात एक तांब्या पाणी टाकून कुकरमध्ये 2 शिट्ट्या घ्या .नंतर कुकर उघडून मंद आचेवर 10 मिनिटे ठेवून जाड रस्सा होईपर्यंत आटवून घ्या .अत्यंत स्वादिष्ट असा मटण मसाला तय्यार.

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*