काकडी कांदा रायते

Cucumber Onion Salad

२ काकड्या
२ कांदे
२ हिरव्या मिरच्या
२ वाट्या दही
१ चमचा मीठ (किंवा जास्त)
अर्धा चमचा साखर
अर्धा चमचा मिरपूड
१ चमचा जिरेपूड
पाव चमचा लाल तिखट
सजावटीसाठी कोथिंबीर

कृती – 

काकड्या व कांदे सोलून बारीक चिरावे. पाणी न घालता दही घुसळावे.

मिरच्या उभ्या चिराव्या व मीठ लावून जरा चुरडाव्या. दह्यात चिरलेले पदार्थ घालावेत. साखर व तिखट घालावे.

वाढायच्या भांड्यात काढून ठेवावे. वरून जिरेपूड, मिरपूड व असल्यास कोथिंबीर घालून फ्रीजमध्ये ठेवावे.

जेवणाचे वेळी थंडगार असावे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*