गोडाचा शिरा

Sweet Sheera

साहित्य :

१ वाटी मध्यम जाड रवा, पाऊण वाटी साखर, १ डाव तूप, १ अष्टमांश चमचा पीठ, १ वाटी उकळीचे पाणी, २ वेलदोड्याची पूड.

कृती :

प्रथम पातेल्यात तूप घालून गॅसवर ठेवावे. तूप तापले की त्यात रवा घालून मंदाग्नीवर चांगला भाजावा. त्यात मीठ घालावे. रवा भाजल्याचा चांगला वास येईल व भाजताना हाताला हलके वाटू लागेल.

नंतर त्यात उकळीचे पाणी घालून  उलथन्याने चांगले ढवळावे. सर्व पाणी आटले की पुन्हा एकदा ढवळून साखर घालावी. सर्व मिश्रण जरा पातळ झाल्यासारखे होईल; पण ढवळत राहावे. जर वेळाने मिश्रण घट्ट होईल.

नंतर त्यात वेलदोड्यांची पूड घालून उतरवावे. कडेने १ चमचा साजूक तूप सोडावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*