मुगाच्या डाळीचा शिरा

Moongdal Sheera

साहित्य :

एक वाटी मुगाची डाळ, एक वाटी साखर, एक वाटी सायीसकट दूध, ३ – ४ वेलदोडे, अर्धी वाटी तूप, बेदाणे, १ टेबलस्पून मिल्क पावडर.

कृती :

मुगाची डाळ भिजत घालावी. नंतर उपसून वाटावी.

नंतर तुपावर वाटलेली डाळ चांगली परतून घ्यावी. नंतर त्यावर दूध घालून हलवावे व साखर घालावी. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पूड व बेदाणे घालावे.

मिल्क पावडरमध्ये थोडे दूध घालून कालवावे व ते शिऱ्यामध्ये घालून ढवळून ध्यावे व उतरवावे

सजवून खायला द्यावा…

 

1 Comment on मुगाच्या डाळीचा शिरा

Leave a Reply

Your email address will not be published.


*