काय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे

सर्वांनाच जेवण करून झाल्यावर बडीशेप खाण्यास आवडते. गोड असो अथवा तिखट जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेप खाण्यास चांगले वाटते. बडीशेपमध्ये विविध औषधी गुणधर्म आढळून येतात. बडीशेपेचे सर्वश्रुत असलेले फायदे म्हणजे अपचन दूर करणे अथवा पोटदुखी कमी करण्यास मदत होते. बडीशेपमध्ये खनिज आणि जीवनसत्त्व तसेच अनेक पोषक तत्वे आढळून येतात. तर अशा ह्या आवडत्या बडीशेपचे उपयोग जाणून घेऊयात:

१) बडीशेपबरोबर खडीसाखर सामान प्रमाणात घेतल्यास डोळ्याची दृष्टी स्वच्छ होऊन आपली नजर तीक्ष्ण करण्यास मदत होते.

२) बडीशेप साखरेबरोबर बारीक चूर्ण करून घेतल्यास बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास पोटाच्या समस्या कमी होऊन बद्धकोष्ठता आणि गॅस दूर होण्यास मदत होते.

३) नियमितपणे जेवून झाल्यावर बडीशेप खाल्यामुळे जेवण चांगले पचायला मदत होते. जेवणानंतर बडीशेप, काळे मीठ आणि जिरे घेऊन हे पाचक चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास जेवण पचण्यास मदत होते.

४) खॊकाला झाला असल्यास बडीशेप आणि मध एकत्र घेतल्याने खोकला कमी होण्यास मदत होते.

५) जर पोटात दुखत असल्यास भाजलेली बडीशेप खाल्यास पोटदुखी कमी होते. बडीशेपची थंडाई बनवून प्यायल्यास शरीराला थंडावा मिळतो तसेच जीव घाबरल्यासारखा होण्याचेही प्रमाणही कमी होते.

६) पाण्यात बडीशेप आणि खडीसाखर टाकून पाणी उकळून पिण्याने आंबट ढेकर येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

अशी ही गुणकारी, सर्वांची आवडती बडीशेप जेवणानंतर नियमितपणे योग्य प्रमाणात खाल्यास आपल्याला अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

Avatar
About Sanket 7 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*