पं. जितेंद्र अभिषेकी

पंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाईल. ‘मत्स्यगंधा’ हे पंडितजीनी संगीत दिग्दर्शन केलेले ना टक १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले आणि खूप गाजलं. […]

बळवंत मोरेश्वर (बाबासाहेब) पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे मराठी इतिहाससंशोधक आहेत. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.
[…]

प्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे

राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्‍यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते […]

मंगेश पाडगावकर

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली. […]

निर्मलकुमार फडकुले

लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. […]

रमेश राजाराम मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची शंभरपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. […]

नरसिंह चिंतामण (न.चिं.) केळकर

साहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा वाहिली. […]

रत्नाकर मतकरी

३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या असे नव्वदपेक्षा अधिक विविध कलाकृतीचे विपुल लेखन करणारे रत्नाकर मतकरी. साहित्याचे विविध प्रकार त्यांनी आपल्या लेखनातून हाताळले असले तरी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख एक प्रतिभावंत नाटककार म्हणून जवळची वाटते. […]

रमेश तेंडुलकर

कवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला. एम. ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे सी. आय. डी. विभागात काम केले. परंतु मुळात समीक्षकाची वृत्ती असल्यामुळे ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात रजू झाले. […]

1 2 3 4