गोंदिया जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

मुबलक प्रमाणात जलसंपदा असल्याने गोंदिया जिल्हा कृषिप्रधान तर आहेच, शिवाय येथे कृषिप्रधान लघु उद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. या जिल्ह्याचे बरेचसे क्षेत्र हे जंगलांनी व्यापले असल्याने येथे वन उत्पादनांशी निगडीत उद्योग मोठया प्रमाणावर चालतात. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता संकलन व बिडी उद्योग हा भरभराटीस आलेला मुख्य व्यवसाय आहे. वनांतून तेंदूची पाने गोळा करणे व त्यांचा वापर विड्या वळण्याच्या उद्योगात करणे – हे प्रमुख उद्योग जिल्ह्यात चालतात.
या शिवाय जिल्ह्यात गोड्या पाण्यातील (तलावांतील) मासेमारी, जंगलांतून डिंक व लाख जमा करणे, बांबूच्या विविध वस्तू बनविणे, मातीच्या विटा, कौले व भांडी तसेच प्राण्यांच्या शिंगापासून वस्तू बनविण्याचे व्यवसाय केले जातात. तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती मोठया प्रमाणावर चालते. इटियाडोह (तालुका-अर्जुनी मोरगाव) व आंभोरा (तालुका – गोंदिया) येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे कार्य करतात. वैनगंगा सहकारी साखर कारखाना तिरोडा तालुक्यात माडगी येथे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*