डेन्मार्क

डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्क ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

डेन्मार्कचा मुख्य भूप्रदेश जुटलँड नावाचा द्वीपकल्प आहे. याशिवाय स्यीलंड, फुनेन, व्हेन्ड्सिसेल, लोलँड, फाल्स्टर आणि बॉर्नहोम सह शेकडो छोटी बेटे डेन्मार्कचा भाग आहेत. फेरो द्वीपसमूह व ग्रीनलँड डेन्मार्कच्या आधिपत्याखालील प्रदेश आहेत. तेथे स्थानिक स्वराज्य असून हे दोन्ही भाग युरोपीय संघाचे भाग नाहीत.

डेन्मार्कच्या मुख्य भूमिच्या दक्षिणेस जर्मनी, ईशान्येस स्वीडन व उत्तरेस नॉर्वे आहेत. डेन्मार्कला उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्रांचा किनारा आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : कोपनहेगन
अधिकृत भाषा : डॅनिश
स्वातंत्र्य दिवस : १ जानेवारी १९७३
राष्ट्रीय चलन : डॅनिश क्रोन (DKK)

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*