प्रागचा किल्ला

प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे. गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड नुसार हा जगातील सर्वांत प्राचीन किल्ला आहे.

जमैका

क्रिकेटमध्ये जमैका हा शब्द आपण बर्‍याचदा ऐकतो. वेस्ट इंडिजमधील हा एक छोटासा भाग. […]

स्वीडन

स्वीडन, नॉर्वे आणि डेनमार्क हे १४ व्या शतकात एका राज्याच्या अधिपत्याखाली आले. १५२३ मध्ये गुस्तव वासाच्या वर्चस्वाखाली ही युती संपुष्टात आली. १७व्या शतकात बाल्टिक प्रदेशातील शक्तिशाली सत्ता म्हणून स्वीडनचा उदय झाला. १८०९ मध्ये स्वीडनमध्ये घटनात्मक […]

स्लेझबर्ग

ऑस्ट्रियातील स्लेझबर्ग हे शहर गोथीक काळातील इमारतींचे सुंदर शहर आहे. आठव्या शतकातील अनेक इमारती, चर्च वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी स्लेझबर्ग पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहेत.

इजिप्त – प्राचीन संस्कृतीचा वारसा

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य देशात वसलेली संस्कृती आहे. उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रिकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली, असे मानले जाते. या संस्कृतीचा पुढे विकास झाला. येथे वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली.

हा लॉंग बे

व्हिएतनामच्या उत्तर-पूर्व भागात हे वसलेले आहे. या खाडीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे. हा लॉंग बे परिसर सुमारे १५५३ किमी आहे. हे विविध आकाराच्या १९६९ बेटांपासून तयार झाले आहे. त्याच्या दक्षिण-पश्चिमेला कॅट बा […]

कापूस – १२००० बीसी

१२००० बीसी पासून इजिप्तशियन संस्कृतीला कापसाची ओळख होती, कापडाचा वापर होता. मेक्झिकन गुंफामध्ये ७००० वर्ष जुने कापडाचे तुकडे व तंतू आढळले. भारतात ३००० वर्षापासून कापसाचे उत्पादन होते.

लठ्ठ माणसांचे बेट – नौरु

दक्षिण प्रशांत बेटावर नौरु येथे सर्वात जास्त लट्ठ माणसं राहतात. येथे ९५ टक्के माणसं लठ्ठ आहेत. शारीरिक निर्देंशांकानुसार येथे २५ वर्षे वयोगटात लठ्ठपणा वाढत आहे. येथील मुख्य आहार फळ आणि मासे आहे.

फिलीपाईन्समधील उडणारा लेमुर

फिलीपाईन्समधील हा सस्तन प्राणी ‘फिलीपाईन्स ईगल’ म्हणून याची ओळख असून वजन १ ते १.७ किलो ग्रॅम व लांबी १४ ते १७ इंच आहे. हा शाकाहारी प्राणी आपल्या खाद्यासाठी १०० मीटर उडू शकतो.

मॅकमोहन रेषा

भारत व तिबेट सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. ही सीमारेषा ब्रिटेन व तिबेट यांच्यातील सिमला परिषदेत निश्चित करण्यात आली होती. हेन्री मॅकमोहन  यांच्या मध्यस्थीतून ही रेषा निश्चित झाली होती.

1 27 28 29 30 31 32