व्हेनिस हे युरोपातील इटलीतील प्रमुख शहर. जगातील प्राचीन शहरांमध्ये याचा समावेश होतो. ११८ छोट्या बेटांच्या समुहानी हे शहर पुलांनी जोडलेले आहे. येथील दळणवळण नौकांमधून चालते. स्थापत्यकला आणि कलाकुसरीसाठी प्रसिध्द असलेल्या या शहराचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.युनेस्कोने या शहराला जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे.
पो आणि पियाव्हे या दोन नद्यांच्या काठावरील हे शहर वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. व्हेनिटी या जमातीतील लोकांच्या नावावरुन या शहराला व्हेनिस हे नाव देण्यात आले.
ऐतिहासिक वारसा असलेले हे शहर दहाव्या शतकात रिपब्लिक ऑफ व्हेनिसची राजधानी होते.
Leave a Reply