भंडारा जिल्हा

महाराष्ट्रातील ‘तांदळाचे कोठार’ म्हणजे भंडारा! अनेक तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा!आणि या तलावांमुळेच जिल्ह्याच्या जलसिंचनात भर तर पडली आहेच,पण जिल्ह्याचा परिसर ही निसर्गरम्यही बनला आहे. जिल्ह्यातील समृद्ध जंगले, मुबलक खनिज संपत्ती, विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि धातूच्या भांड्यांची निर्मिती व त्यावरील पारंपरिक कलाकुसर हीदेखील जिल्ह्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.