अल्जीरिया

अल्जीरिया हा आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातील माघरेब प्रदेशामधील एक देश आहे. अल्जीरियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र, ईशान्येला ट्युनिसीया, पूर्वेला लिब्या, आग्नेयेला नायजर, नैऋत्येला माली व मॉरिटानिया तर पश्चिमेला मोरोक्को व पश्चिम सहारा हे देश आहेत. क्षेत्रफळानुसार अल्जीरिया सुदानखालोखाल आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तर जगातील १०व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. अल्जीयर्स ही अल्जीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

ऐतिहासिक काळामध्ये रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या अल्जीरियावर सातव्या शतकामध्ये मुस्लिमांनी अधिपत्य मिळवले. मध्य युग काळादरम्यान येथे अनेक विद्वान व पंडितांचे वास्तव्य होते. सुमारे इ.स. १५१७ साली हा भूभाग ओस्मानी साम्राज्यामध्ये आणला गेला. १९व्या शतकाच्या सुरूवातीस अमेरिका व बार्बरी राज्यांमध्ये झालेल्या दोन युद्धांमुळे अल्जीरियाची स्थिती कमकूवत झाली होती. ह्याचा फायदा घेत फ्रेंचांनी हा भाग काबीज केला. इ.स. १८३० पासून फ्रान्सची वसाहत असलेल्या अल्जीरियाला १९६२ साली स्वातंत्र्य मिळाले.

सध्या अल्जीरियामध्ये अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार असून अब्देलअझीझ बुतेफ्लिका हा १९९९ सालापासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे मोठे साठे असलेल्या अल्जीरियाची अर्थव्यवस्था ह्या उद्योगांवर अवलंबुन आहे. अल्जीरिया आफ्रिकन संघ, अरब संघ, ओपेक, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

ईशान्येला ट्युनिसीया; पूर्वेला लिब्या; आग्नेयेला नायजर; नैऋत्येला माली, मॉरिटानिया; पश्चिमेला मोरोक्को, पश्चिम सहारा

राजधानी व सर्वात मोठे शहर : अल्जीयर्स
अधिकृत भाषा : अरबी
इतर प्रमुख भाषा : बर्बर, फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : जुलै ५, १९६२ (फ्रान्सपासून)
राष्ट्रीय चलन : अल्जीरियन दिनार(DZD)

देश : अल्जेरिया
राजधानी : अल्जिरस
चलन : अल्जेरियन डायनर


Country : Algeria
Capital city : Algiers
Currency : Algerian dinar
Calling code : 213

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*