तांबे, भास्कर रामचंद्र (भा. रा. तांबे)

Tambe, Bhaskar Ramchandra (Bha Ra Tambe)

जन्म- ऑक्टोबर २७, १८७३
मृत्यू- इ.स. १९४१

अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

त्यांच्या काही प्रसिध्द कविता –
जन पळभर म्हणतिल हाय हाय!
नववधू प्रिया मी बावरते
कळा ज्या लागल्या जीवा
मावळत्या दिनकरा
तिन्ही सांजा सखे मिळाल्या
भा. रा. तांबे हे मराठी काव्य सृष्टीमध्ये फुललेले, व रसिकतेला आपल्या हजारो नवकल्पनांच्या पाकळ्यांनी भुरळ पाडणारे विलोभनीय व सप्तरंगी कमळ होते. मृत्यूसारख्या धीरगंभीर व अथांग अशा खोल विषयाला कल्पक शब्दरचनांच्या शृंखलांमध्ये बांधण्याचा प्रयत्न त्यांच्या कवितांनी केला. मृत्यू या शब्दाबद्दल पहिल्यापासून, त्यांना कसले तरी सुप्त आकर्षण होते. मृत्यूविषयी आतुरता,  असाहाय्यता, निराशा, वात्सल्य, भय, निराशा, साशंकता, अनामिक खिन्नता अशा विविध भावनांची चित्रे शब्दकुंचल्याने रंगवित, तांबे मृत्यूच्या स्वागतासाठी स्वतःला तयार करत गेलेले दिसतात. मृत्यूविषयीच्या त्यांच्या कविता इतक्या करूणसुंदर आहेत, की प्रत्यक्ष मृत्यूलाही पाझर फुटावा! म्रूत्यू म्हणजे परमेश्वरभेटीचे एक माध्यम असल्याचे त्यांनी मानले. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असे समजून स्वतःचा आणि इतरांचा प्रवास सुखकर कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी नेहमी सुचविले

भा. रा. तांबे यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

मराठीतील श्रेष्ठ गीतकार व भावकवी भा. रा. तांबे (8-Dec-2016)

मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे (28-Oct-2019)

3 Comments on तांबे, भास्कर रामचंद्र (भा. रा. तांबे)

  1. भा. रा. तांबेंची माहिती छान. त्यांच्या काही कवितांचे अर्थसाहित थोडक्यात स्पष्टीकरण पाहिजे आहे. मिळेल का?

Leave a Reply

Your email address will not be published.


*