अवचट, (डॉ.) अनिल

डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक आहेत.

अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओत्तुर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची २२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

डॉ. अनिल अवचट यांचे केवळ लिखाणच नव्हे तर त्यांचे सामाजिक कार्य ही आदर्श आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी सुनंदा यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे. विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणार्‍या कार्यकर्त्यांविषयीही त्यांनी लिखाण केले आहे.

डॉ. अवचट यांचे लेखन हे प्रेरणादायी आहे. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या आहेत. नवीन पिढीलाही त्यांचे लेखन प्रेरणादायी वाटते यात शंका नाही.

अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही आहेत. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी,बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.

१. डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तक” म्हणून जाहीर केली आहेत.

२. अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या सम्मेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.

३. सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).

साहित्यसंपदा

वेध, पूर्णिया, छेद, वाघ्या मुरळी, हमीद, मोर, आप्त, गर्द, धागे आडवे उभे, धार्मिक, माणसं, कोंडमारा, स्वत:विषयी, अमेरिका,संभ्रम, कार्यरत,छंदांविषयी, प्रश्न आणि प्रश्न, दिसले ते, जगण्यातले थोडे, मस्त मस्त उतार, सृष्टीत…गोष्टीत

अनिल अवचट यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार डॉ.अनिल अवचट (26-Aug-2017)

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट (27-Jan-2022)

## Dr. Anil Avchat

1 Comment on अवचट, (डॉ.) अनिल

  1. खुप छान माहिती मिळाली.आजच त्यांच्या निधनाबद्दल कळले. खूप वाईट वाटते. मी त्यांचे लेख व पुस्तक वाचलय. व्यसनमुक्ती केंद्राचे महान कार्य ते करीत होते. व्यासंगी होते. मोठेपण कधीही मिरवले नाही. For adults and children he was easily and equally available. 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published.


*