टोमाटोची झटपट भाजी

साहित्य :- मोठे लालभडक टोमाटो तीन-चार, कांदे दोन मध्यम आकाराचे, तीन-चार हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, तीन चमचे तेल, तिखट एक चमचा, चवीपुरतं मीठ वं साखर.

कृती :- १) टोमाटो , कांदे चिरून घ्यावेत . मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत . कोथिंबीर चिरून घ्यावी . २) फोडणी करून (इथं मोहरीऐवजी मेथी वापरल्यास खमंग लागते .) त्यात कांदा परतावा . ३) कांदा गुलाबी झाल्यावर टोमाटोच्या फोडी , मिरच्या व कोथिंबीर घालावी . मीठ , तिखट , साखर घालून तीन-चार मिनिटं शिजवावी . ४) ही भाजी ब्रेडवर पसरून खायला चांगली लागते . मधल्या वेळच्या खाण्यासाठीही चांगली आहे . ५) घाईच्या वेळेत ही भाजी पटकन होते . पांढऱ्या शुभ्र भाताच्या मुदीवर ही भाजी वाढल्यास पानाची शोभा वाढवते . ६) हल्ली मिळतो तो कांदा-लसूण मसालाही यात टाकल्यास छान लागतो .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*