पेंडपाला ( स्पेशल सोलापुरी पदार्थ )

साहित्य : एक वाटी हरबरा/चण्याची डाळ,अर्धी वाटी तुरीची डाळ,चार चमचे शेंगदाण्याचे कुट१० – १२ लसणाच्या पाकळ्या,मूठभर कोथिंबीर,एक छोटा चमचा हळद, दोन चमचे काळा मसाला किंव्हा गोडा मसाला, लाल तिखट, चवी नुसार मीठ,फोडणीसाठी तेल , जिरे , मोहरी , लाल मिरच्या.

कृती :
प्रथम कुकर मध्ये चण्याची डाळ आणि तुरीची डाळ घालावी आणि ती बुडेल त्या पेक्षा थोडं जास्त पाणी घालावा आणि त्याचा साधारण २-३ शिट्या कराव्या. फक्त काळजी एवढी घ्यायची की डाळ जास्त शिजली नाही पाहिजे. म्हणजे साधारण बोटचेपी अशी शिजली पाहिजे. जर डाळ शिजून त्यात थोडं पाणी राहिले असेल तर ते काढून टाकावे.नंतर त्यात शेंगदाण्याचे कुट, काला किंवा गोडा मसाला,हळद,तिखट, मीठ आणि लसूण ठेचून टाकावा. नंतर त्यात भरपूर कोथिंबीर घालावी.

नंतर एका कढईत फोडणी करावी त्यात २ -३ लाल मिरच्या घालाव्यात . आणि वरील सर्व एकत्र केलेलं साहित्य फोडणीत घाला आणि वाफ येइपर्यन्त परतून घ्या.

एका सव्हिंग बाउल मध्ये काढून सर्व्ह करा. हा पदार्थ भाकरी सोबत खूप छान लागतो. त्याच्या जोडीला फोडणीचं ताक आणि कांदा तोंडी लावायला असेल तर उत्तमच.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*