साहित्य – तीन वाट्या तांदूळ, एक वाटी उडीदडाळ गिरणीतून रवाळ दळून आणावे.
मसाला – आलं, मिरची, थोडीशी काळी मिरी, ताक, इनो वगैरे.
कृती – दळून आणलेल्या पिठापैकी दोन ते तीन वाट्या पीठ थोडेसं ताक घालून इडलीच्या पिठाप्रमाणे भिजवून ठेवावे. सात-आठ तासांनी पीठ फुगल्यावर त्यात आल्याचा तुकडा, दोन मिरच्या वाटून घालाव्यात. भांड्याला तेल लावून पिठात थोडंसं इनो घालून ढोकळ्याप्रमाणे वाफवण्यास ठेवावं. वाफवण्याआधी त्यावर थोडीशी जाडसर मिरपूड पसरावी व ढोकळ्याप्रमाणे वाफवून काढावं. ढोकळ्यापेक्षा पातळ काप करून वरून हिंग, जिरे वा तिळाची फोडणी द्यावी (ऐच्छिक).
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply