हिरव्या वाटणातील कोलंबी

साहित्य: पाव किलो मध्यम आकाराची सोललेली कोलंबी ,1 मोठा कांदा बारीक चिरलेला ,१ छोटा चमचा गरम मसाला ,अर्धा चमचा हळद ,१ तमालपत्र ,१ चमचा लिंबाचा रस ,५ ते ६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण

हिरवं वाटण: एक खोबऱ्याची भाजलेली वाटी , ७ ते ८ पाकळ्या लसूण ,५ ते ६ हिरव्या मिरच्या , कोथिंबीर , अर्धा चमचा जिरे , अर्धा तुकडा आलं (आवडीनुसार 4 ते 5 पुदिन्याची पाने) मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या .

कृती: सोललेली कोलंबी स्वच्छ धुवून त्यावर १ चमचा गरम मसाला ,अर्धा चमचा हळद आणि १ चमचा लिंबाचा रस टाकून 15 ते 20 मिनीटे चांगलं मॅरीनेट करून घ्या . दोन पळी तेल गरम करून घ्या , त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तमालपत्र लालसर होईपर्यंत परतवा.
आता भांड्यामध्ये म्यारीनेट केलेली कोलंबी आणि तयार हिरवं वाटण तसेच ५ ते ६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा . आपल्या चवीनुसार मीठ आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे ठेवून सतत ढवळत राहा . मस्तपैकी गरम गरम हिरव्या वाटणातील सुक्की कोलंबी तय्यार .

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*