नाचणीच्या पिठाच्या सोप्या वड्या

साहित्य :- 2 वाट्या नाचणीचे पीठ, 2 वाट्या अगदी बारीक चिरलेला गूळ, 4-5 वेलदोड्यांची पूड, 1 मोठा चमचा देशी तीळ, 2 मोठे चमचे साजूक तूप.

कृती :- प्रथम तुपावर नाचणीचे पीठ भाजून घ्यावे. पीठ भाजत आले, की त्यातच तीळ टाकून जरा भाजावेत. मग पातेले खाली उतरवून मिश्रण गरम आहे, तोवरच त्यात गूळ व वेलची-पूड घालून हलवावे. तूप लावलेल्या “ट्रे’मध्ये हे गरमागरम मिश्रण ओतून लगेच 5 मिनिटांत वड्या कापाव्यात. या वड्या करताना पाक करण्याची जरुरी नाही. फक्त गूळ मात्र छान बारीक चिरलेला हवा. खूप दिवस टिकतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*