मोदकाची आमटी

विदर्भातिल नागपूरची मोदकांची आमटी खासियत आहे. त्याचीच ही रेसिपी.
मोदकाच्या पारीसाठी साहीत्य : एक वाटी डाळीचे पीठ,एक छोटा चमचा तिखट, एक छोटा चमचा मीठ, चिमूटभर हींग, एक छोटा चमचा हळद.
कृती : डाळीच्या पीठात सांगितलेले साहीत्य घालून थोड्या पाण्यात तेलाचा हात लावून घट्ट गोळा करणे.
सारणासाठीचे साहित्य : एक वाटी किसलेले सुके खोबरे,एक चमचा भाजून घेतलेली व बारीक करून घेतलेली खसखस ,चवीनुसार तिखट-मीठ,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर साखर.कृती : एका मोठ्या बाऊलमध्ये वर दिलेले सारणाचे सर्व साहित्य एकत्र मिसळून हे सारण तयार करावे.
मोदकांची कृती : पारीसाठीचे भिजवलेले पीठ पुरीपेक्षाही निम्मी लाटी घेऊन त्याची उकडीचे मोदक भरुन घेतो तश्या पद्धतीने तयार सारण भरुन छोटे छोटे मोदक यार करुन घ्यावेत.
ग्रेव्हीसाठी साहित्य : एक कांदा उभा चिरुनघ्या,एक वाटी कीसलेले सुके खोबरे,अर्धी वाटी शेंगदाणे, ५ – ६ पाकळ्या लसूण, अर्धी तीळ.
कृती : वर दिलेले सर्व साहीत्य एकएक करुन तेलावर परतून घ्या. व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट करा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. त्या गरम तेलात मोहरी, हिंग घालून परतून खमंग तडका फोडणी करा. नंतर त्याच पॅनमध्ये मिक्सरवर वाटलेली पेस्ट चांगली परतून घ्या. नंतर त्यात आपल्याला हवे तेवढे सरसरीत होण्यासाठी पाणी घाला. त्यात मीठ तिखट चवीप्रमाणे घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हा रस्सा चांगला उकळल्यावर त्यात वरील मोदक सोडा. गॅस बारीक करुन ५ मिनीटे हे मोदक शिजू द्या.

अशी ही मोदकाची आमटी, गरम गरम भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा,आणि लसणाची ओली पाट्यावर वाटलेली चटणी घालून सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*