मेदुवडे

साहित्य:- २ वाट्या उडदाची डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे, मीठ, उडदाचे पीठ १- २ चमचे
ओल्याखोबर्या:चे लहान तुकडे ,कढिलिंबाची ५-६ पाने- बारीक चिरून, २ हिरव्या मिरच्या- बारीक तुकडे करून, थोडी मीरपूड किवा ५-६ मिरे ठेचून. मीठ चवीनुसार, अॅदलु.फॉईल.
कृती:- उडदाची डाळ ४ ते ५ तास भिजत घाला, त्यातच मेथ्याही घाला. नंतर जाडसर भरड वाटा. वाटताना कमीतकमी पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला. वाटलेले पीठ हाताने उभे वरखाली करून भरपूर फेसा म्हणजे ते हलके होईल. त्यात खोबर्या चे तुकडे, मिरपूड किवा ठेचलेले मिरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे ,कढिलिंबाची बारीक चिरलेली पाने घालून परत एकदा चमच्याने फेसा.
कितीही कमी पाणी घालून वाटले तरी ते नीट वाटले जायला थोडेफार पाणी कमीजास्त करावे लागते अशावेळी सगळे पीठ वाटून झाले की त्यात चमचा दोन चमचे उडदाचे पीठ घाला. त्याने पीठाला घट्टपणा येईल. १८० अंश से वर एअर फ्रायर ५ मि. प्रिहिट करा. एअर फ्रायर वापरत असल्याने हातावर वडे करून अॅालु.फॉईलच्या छोट्या तुकड्यांवर ठेवा. किवा डोनट मोल्ड असल्यास मोल्ड ला तेलाने ब्रश करून घ्या व त्यात वड्याचे मिश्रण घाला. डोनट मोल्ड मध्ये वडे घालताना पीठ थोडे पातळ हवे. वडे आधी ९ मिनिटे एअर फ्राय करा. मग ते बाहेर काढा, मोल्ड मधून ताटलीत उपडे करा. ते घट्टसर झालेले असतील. त्याला ब्रशने ऑइल ग्रिझिंग करा आणि आता मोल्डशिवाय वडे अजून ५ मिनिटे एअर फ्राय करा, उघडून पहा. लागल्यास अजून एखाद दोन मिनिटे एअर फ्राय करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*