मसाला पराठा

साहित्य :- प्रत्येकी एक चमचा धनेपूड, जिरे पूड , तेल किंवा बटर, कांदा मसाला किंवा गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा पिठीसाखर, दोन-तीन चमचे तीळ, सहा पोळ्यांची कणीक (नेहमीचच) .

कृती :- १) कणकेचा एक गोळा घेऊन पिठीवर फुलक्याएवढी पोळी लाटावी .
२) मग नेहमीप्रमाणे तेल वा बटर लावावं . तीळ सोडून इतर सर्व मसाले एकत्र कालवावे .
३) त्यापैकी एक चमचा मसाला लाटलेल्या फुलक्यावर पसरावा व त्याची गुंडाळी करून चकलीप्रमाणे घट्ट वळवावी , दाबावी व पिठी आणि तिळावर जाडसर लाटावी . तेल सोडून हा पराठा खरपूस भाजावा . सॉसबरोबर वाढवा .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*