मॅक अॅण्ड चिझ पास्ता

Mac and Cheese Pasta

साहित्य :

मॅकरोनी, ५० ग्रॅम बटर, ४ क्युब्स चिझ, ओरिगानो, चिली फ्लेक्स, दिड कप दूध.

कृती :

सर्वप्रथम पॅनमध्ये ५० ग्रॅम बटर घालून त्यावर दिड कप दूध घालणे. नंतर त्यात चिझ घालून हे मिश्रण घाटून घेणे.

त्यानंतर दुसर्‍या कढई मध्ये पास्ता पाण्यात उकडवून तो मऊ झाल्यावर त्यात हे मिश्रण घालणे.

त्यानंतर वरुन ओरिगानो व चिलीफ्लेक्स घालणे. मॅक अॅण्ड चिझ पास्ता तयार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*