कणकेचा शिरा

साहित्य:- पाऊन वाटी गव्हाची जाडसर कणिक, पाव वाटी तूप, अर्धी वाटी साखर, १ ते दीड वाटी दूध, आवडीप्रमाणे सुका मेवा.

कृती:- १)प्रथम एका कढईत तूप गरम करत ठेवावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व चांगले परतून घ्यावे .मिश्रण जास्त कोरडे वाटल्यास अजून थोडे तूप घालावे .कणिक चांगली लालसर परतून घ्यावी .

२)कणिक चांगली लालसर झाली कि त्यात १ ते दीड वाटी गरम दूध घालावे व लगेचच साखर घालावी व चांगले परतून घ्यावे .आता लगेचच यांत सुका मेवा घालून परतून घ्यावे .

३)शिरा खाली चिटकू शकतो म्हणून सतत परतत रहावे ,दूध घातल्यानंतर साधारण ५ मिनिटातच कणिक आळायला लागते म्हणजेच समजावे कि शिरा तयार झालेला आहे लगेच आच बंद करून गरमागरम शिरा सर्व्ह करावा .

टीप:- १)या शिऱ्यासाठी आपण साधी पोळ्यांची कणिकही वापरू शकतो पण त्यासाठी ही कणिक खूप जास्त भाजावी लागते नाहीतर शिरा एकदम चिकट येतो .

२)कणिक चांगली लालसरच भाजली गेली पाहिजे नाहीतर शिऱ्याची चव बिघडण्याची शक्यता असते .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*