साहित्य:- एक वाटी काळा सीडलेस खजूर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी भाजलेली खसखस पूड, एक चमचा वेलची पूड, दीड वाटी मैदा किंवा कणीक, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी.
कृती:- मिक्सकरमध्ये खजूर बारीक करून घ्यावा. त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस घालून चांगले एकजीव करावे. गोळा करून घ्यावा. मैद्यात किंवा कणकेत मीठ घालून पीठ भिजवून घ्यावे.
मैद्याच्या दोन पारी करून त्यामध्ये खजुराच्या गोळ्याची पारी घालून बंद करून पिठीवर पोळी लाटावी.मंद आचेवर भाजावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply